Skip to content

Flattery बद्दल बायबलमधील वचने: General references

9 वचने · 20 पैलू

General references बद्दल वचने

  1. मी पक्षपात करणार नाही, ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार;

  2. कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो, तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल.

  3. याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.

  4. त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही; त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.

  5. प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.

  6. खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.

  7. उलट, आम्ही परमेश्वराला मान्य असलेले व जी शुभवार्ता आमच्यावर सोपवून दिली आहे ज्यापुढे बोलतो. आम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर परमेश्वराला करतो जे हृदये पारखणारे आहेत.

  8. तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत.

  9. आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्‍या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही.