मुख्य मजकुरावर जा

Feast of Trumpets बद्दल बायबलमधील वचने: When and how observed

8 वचने · 2 पैलू

"Feast of Trumpets" साठी शोधा

When and how observed बद्दल वचने

  1. “इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत.

  2. या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”

  3. “ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.

  4. याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.

  5. गोर्‍ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश;

  6. आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.

  7. तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा.

  8. मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.