मुख्य मजकुरावर जा

Nehemiah

5 वचने · 2 कुटुंब सदस्य

Nehemiah चा उल्लेख असलेली वचने

  1. हखल्याहचा पुत्र नहेम्याहची वचने: विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात असताना,

  2. मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते.

  3. या करारावर सही करणाऱ्यांची नावे: राज्यपाल: हखल्याहचा पुत्र नहेम्याह. सिद्कीयाह,

  4. योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते.

  5. म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत.