Skip to content

False Accusation बद्दल बायबलमधील वचने: General references

12 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.

  2. खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही.

  3. “ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.

  4. माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”

  5. जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.

  6. माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.

  7. “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.

  8. प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.

  9. “माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.

  10. काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”

  11. ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे,

  12. जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.