मुख्य मजकुरावर जा

Deacon बद्दल बायबलमधील वचने: Ordained by the apostles

6 वचने · 4 पैलू

Ordained by the apostles बद्दल वचने

  1. त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे.

  2. तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी.

  3. तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ.

  4. आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.”

  5. गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते

  6. या पुरुषांना प्रेषितांपुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यावर आपले हात ठेवले.