मुख्य मजकुरावर जा

Cherubim बद्दल बायबलमधील वचने: Form and appearance of

7 वचने · 21 पैलू

Form and appearance of बद्दल वचने

  1. आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते,

  2. परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते.

  3. त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते.

  4. त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते.

  5. एकाचे पंख दुसर्‍याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे.

  6. त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.

  7. अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई.