Bridegroom बद्दल बायबलमधील वचने: Song of
Song of बद्दल वचने
माझ्या प्रिये, तू सर्वांगी सुंदर आहेस; तुझ्यात काहीही उणीव नाही.
माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, लबानोनाहून माझ्यासोबत ये, अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, सिंहाच्या गुहांपासून आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये.
अगे माझ्या भगिनी, माझी वधू; तुझ्या एकाच नजरेने तुझ्या माळेच्या एकाच मणीने तू माझे हृदय चोरून घेतले आहेस.
माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे! तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे, इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे.
माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात; दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत. तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.
माझ्या भगिनी, माझ्या वधू तू एका बंद केलेली बाग आहेस; तू एक कुंपणाने घेरलेल्या झर्यासारखी, शिक्कामोर्तब कारंज्याप्रमाणे आहेस.
तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत,
अगरू आणि केशर, वेखंड आणि दालचिनी, सर्व प्रकारची सुगंधी झाडे, तसेच गंधरस आणि जटामांसी आणि सर्व उत्तम मसाले आहेत.
या बागेतील पाण्याचा झरा, लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्या वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस.
उत्तरेच्या वार्या, जागा हो, आणि दक्षिणेच्या वार्या, ये; माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा, म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा. माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या, आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या.