मुख्य मजकुरावर जा

Ax बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्‍हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.

  2. नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्‍हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता.

  3. त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्‍हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्‍हाड उसनी मागून आणली होती!”

  4. परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्‍हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले.

  5. दाट वृक्षांना कुर्‍हाडीने उद्ध्वस्त करणार्‍या माणसांसारखे ते वागले.

  6. त्यांनी कुर्‍हाडी आणि घण घेऊन सर्व कोरीव नक्षीकामांची मोडतोड करून तुकडे केले.