Arphaxad बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.
अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.
शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.