Anarchy बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.
एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”
पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”
यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.
बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा.
कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.”
विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;
स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत.
परंतु हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. ते उपजत निर्बुद्ध प्राणी पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे स्वतःचा सुद्धा नाश करून घेतील.
त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.
त्यांच्या नजरेत व्यभिचार भरला असून पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!
ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत.
परंतु त्याच्या अयोग्य कृत्याबद्दल गाढवाद्वारे त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.
हे लोक कोरड्या झर्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.
कारण जेव्हा चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात.
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”
अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.
परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”
तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.
त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.
हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.
ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.