Ahira बद्दल बायबलमधील वचने: Captain of the tribe of Naphtali.
Captain of the tribe of Naphtali. बद्दल वचने
नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.
बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
पापार्पणासाठी एक बोकड;
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता.