Skip to content

Afflicted बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे,

  2. तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा.

  3. जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.

  4. तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.

  5. तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.

  6. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.