Skip to content

Achaia बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात ठरविले व म्हटले, “तिथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणीही भेट दिली पाहिजे.”

  2. कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे.

  3. त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला.

  4. तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,

  5. परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून,

  6. कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.

  7. जोपर्यंत ख्रिस्ताचे सत्य मजमध्ये आहे, तोपर्यंत अखया प्रांतातील कोणीही मी करीत असलेल्या अभिमानास प्रतिबंध करू शकणार नाही