मुख्य मजकुरावर जा

Laish

4 verses

33.2400, 35.6500 गूगल नकाशावर पाहा

Laish चा उल्लेख असलेली वचने

  1. म्हणून ते पाच माणसे निघून लईश येथे आले, तिथे त्यांनी पाहिले की सर्व लोक सुरक्षितपणे राहत होते, ते सीदोनी लोकांप्रमाणे शांततेत व सुरक्षित राहत आहेत. आणि त्यांच्या जमिनीत कशाचीही कमतरता नसल्यामुळे ते समृद्ध होते. तसेच, ते सीदोनी लोकांपासून लांब राहत होते आणि इतर कोणाशीही त्यांचा संबंध नव्हता.

  2. नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.”

  3. मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले.

  4. त्यांनी त्या शहरास आपला पूर्वज, इस्राएलचा एक पुत्र दान त्याचे नाव दिले—त्या शहराचे मूळ नाव लईश होते.