मुख्य मजकुरावर जा

स्तोत्रसंहिता५८

पार्थिव न्यायाधीशांचा भ्रष्टाचार

संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय?
नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.
दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात; गर्भात असतानाच ते लबाड्या करतात.
त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,
की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.

दुष्टांच्या नाशासाठी प्रार्थना

हे परमेश्वरा, त्यांचे विषाचे दात पाडून टाका; याहवेह, या सिंहांच्या दाढा उपटून काढा.
त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा; जेव्हा ते धनुष्य रोखतात, तेव्हा त्यांचे बाण लक्ष्य गाठू नयेत.
गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या; सूर्याचे दर्शन न घेता मरण पावणार्‍या, अकाली जन्मणार्‍या गर्भासारखे ते होवोत.
काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी— ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.

देवाच्या न्याय्य न्यायाचे समर्थन

१०
जेव्हा दुष्टांचा सूड घेतला जाईल, तेव्हा नीतिमान लोक आनंद मानतील; दुष्ट लोकांच्या रक्ताने ते आपले पाय धुतील.
११
तेव्हा लोक म्हणतील, “नीतिमानाला आताही निश्चितच प्रतिफळ मिळते; आणि खचित पृथ्वीवर यथार्थपणे न्याय करणारे परमेश्वर आहेत.”
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options