Skip to content

स्तोत्रसंहिता४

नीतिमान ठरविण्यासाठी विनंती

१
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.
२
अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह

अधार्मिकांना बोध

३
हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील.
४
भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह
५
त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.

देवाच्या मुखदर्शनाचा आनंद

६
“आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्‍याचा प्रकाश आम्हावर पाडा.
७
विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे.

दैवी सुरक्षिततेत विश्रांती

८
मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options