Skip to content

स्तोत्रसंहिता३

संकट व उपहास

१
दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला. याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!
२
पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला

देवावर माझी ढाल म्हणून विश्वास

३
परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.
४
मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

धोक्यात शांत झोप

५
मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.
६
असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.

दैवी सुटकेसाठी प्रार्थना

७
याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका.
८
कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options