Privileges of Saints बद्दल बायबलमधील वचने: Salvation
Salvation बद्दल वचने
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”