मुख्य मजकुरावर जा
जखऱ्याह ६:९-१५

येशवाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक

जखऱ्याह ६:९-१५
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१०
“हेल्दय, तोबीयाह व यदायाह यांनी बाबेलमध्ये बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांकडून आणलेले रुपे व सोने घे. त्याच दिवशी तू सफन्याहचा पुत्र योशीयाहच्या घरी जा.
११
रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव.
१२
त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल.
१३
तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’
१४
हेलेम, तोबीयाह आणि यदायाह आणि सफन्याहचा पुत्र हेन, यांना याहवेहच्या मंदिराचे स्मृतिचिन्ह म्हणून मुकुट देण्यात येईल.
१५
दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options