Skip to content
जखऱ्याह ७:१-३

उपवास चालू ठेवण्याविषयी शिष्टमंडळाची विचारणा

जखऱ्याह ७:१-३
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्‍याहला याहवेहकडून संदेश मिळाला.
बेथेल शहरात राहणार्‍या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी,
सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना विचारून, “मी इतकी वर्षे करत आलो त्याप्रमाणे मी पाचव्या महिन्यात शोक व उपवास करावा काय?”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options