जखऱ्याह १४:६-११
६
त्या दिवशी सूर्यप्रकाश नसेल व थंड, धुक्याचा अंधकारही नसेल.
७
तो एक अद्वितीय दिवस असेल—फक्त याहवेहलाच माहीत असलेला तो दिवस असेल—दिवस व रात्रीत फरक राहणार नाही. संध्याकाळ झाली, तरीही प्रकाश असेल.
८
त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.
९
तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.
१०
यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.
११
तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.
Settings