Skip to content
गीतरत्न ७:१-५

प्रियकराकडून शूलम्मीच्या सौंदर्याची स्तुती

गीतरत्न ७:१-५
हे राजकन्ये, पायतणे घातलेले तुझे पाय किती सुंदर दिसतात! कुशल कारागिराने घडविलेल्या रत्नाप्रमाणे तुझ्या मांड्या वळणदार आहेत.
तुझी नाभी गोलाकार पेल्यासारखी असून, त्यात मसालेदार मद्याची कधीच वाण पडत नाही, तुझी कंबर कमळिनीपुष्पांनी वेढलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत.
हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.
तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे. तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे; या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options