गीतरत्न ४:१-५
१
किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! आहा, किती सुंदर आहेस! तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.
२
तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत, प्रत्येकाला आपले जुळे आहेत; त्यापैकी कोणीही एकटे नाहीत.
३
किरमिजी सुताप्रमाणे तुझे ओठ आहेत; तुझे ओठ मनमोहक आहेत. ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
४
तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजाप्रमाणे आहे, जो शिलाकृतीने बांधला आहे; ज्यावर योद्धांच्या एक हजार ढाली लटकलेल्या आहेत.
५
तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत, कमळपुष्पांमध्ये चरतात
Settings