Skip to content
गीतरत्न २:१-५

गीतरत्न २:१-५

१
मी शारोनाचा गुलाब आहे, खोर्‍यातील कमळ आहे.
२
खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी इतर तरुणींमध्ये माझी प्रिया आहे.
३
जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.
४
त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा.
५
मनुक्यांनी मला बळ द्या, सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options