मुख्य मजकुरावर जा
रोमकरांस ११:१-१०

देवाने इस्राएलला टाकलेले नाही

रोमकरांस ११:१-१०
मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे.
ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली:
“प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.”
वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत,
आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.
मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले,
जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”
दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो.
१०
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options