प्रकटीकरण ८:७-१३
७
पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.
८
नंतर दुसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.
१०
मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.
११
त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
१२
चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.
१३
मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”
Settings