प्रकटीकरण १९:१-६
१
यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!
२
कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”
३
आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.
४
तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!”
५
तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.”
६
नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात!
Settings