Skip to content
प्रकटीकरण १३:१-२

प्रकटीकरण १३:१-२

तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्‍यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.
हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options