Skip to content
प्रकटीकरण १३:११-१८

प्रकटीकरण १३:११-१८

११
मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्‍याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता.
१२
प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले.
१३
त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या.
१४
कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.
१५
या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्‍या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”
१६
त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी.
१७
त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा त्यांच्यावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
१८
हे समजण्यासाठी सुज्ञतेची आवश्यकता आहे. कोणाजवळ अंतर्ज्ञान असेल, तर त्याने त्या पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याच्या नावाची सांकेतिक संख्या आहे. ती संख्या 666 अशी आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options