स्तोत्रसंहिता ९:१३-१८
१३
हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा,
१४
मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन.
१५
दुसर्यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत; स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत.
१६
याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला
१७
परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे मृतांच्या राज्यात पाठविली जातात.
१८
परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही; दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाहीत.
Settings