स्तोत्रसंहिता ८८:८-१६
८
माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून, त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे. मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.
९
वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत. याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो; हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.
१०
कारण कबरेत गेलेल्यांमध्ये तुम्ही चमत्कार करणार काय? जे मेलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय. सेला
११
तुमच्या प्रेमाची घोषणा कबरेत जाहीर होणार काय? तुमची विश्वसनीयता विनाशात कशी प्रदर्शित होणार?
१२
अंधकारमय स्थान तुमची अद्भुत कृत्ये घोषित करेल काय? अथवा विस्मरणाच्या भूमीत तुमच्या नीतिमत्तेची साक्ष देता येईल काय?
१३
परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो; माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.
१४
हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला, आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?
१५
तारुण्यापासून मी दुःखी आणि मरणोन्मुख आहे; तुमच्या भीतीने ग्रस्त होऊन मी असहाय झालो आहे.
१६
तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे. तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.
Settings