Skip to content
स्तोत्रसंहिता ८८:३-९

मृत्यूच्या समीप व संपूर्ण एकाकीपणा

स्तोत्रसंहिता ८८:३-९
क्लेशांनी मला जेरीस आणले आहे आणि माझे जीवन मृत्यूच्या जवळ येत आहे.
गर्तेत पडणार्‍यांमध्ये माझी गणना झाली आहे; जणू काही माझी सर्व शक्ती नष्ट झाली आहे.
मृतांमध्ये मला असे टाकण्यात आले आहे, जसे वधलेल्यास कबरेत ठेवतात, आणि ज्यांचे तुम्हाला विस्मरण झाले आहे, ज्यांना तुमच्या आश्रयापासून दूर करण्यात आले आहे.
तुम्ही मला अत्यंत खोल दरीत ढकलून दिले आहे, काळ्याकुट्ट डोहात टाकले आहे.
तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे; तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे. सेला
माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून, त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे. मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.
वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत. याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो; हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options