Skip to content
स्तोत्रसंहिता ८१:६-१०

स्तोत्रसंहिता ८१:६-१०

“आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्‍याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.
तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला
माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन— हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!
तू कोणत्याही परराष्ट्रीय दैवताची कधीही उपासना करू नकोस; माझ्याशिवाय तू इतर कोणत्याही दैवताला वंदन करू नकोस.
१०
मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options