स्तोत्रसंहिता ८१:४-८
४
इस्राएलसाठी हे विधी आहेत, हे याकोबाच्या परमेश्वराचे नियम आहेत.
५
जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले. मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली:
६
“आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.
७
तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला
८
माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन— हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!
Settings