मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ८०:१४-१९

दैवी हस्तक्षेपासाठी नव्याने विनंती

स्तोत्रसंहिता ८०:१४-१९
१४
हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या.
१५
तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.
१६
कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे; तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात.
१७
जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.
१८
मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.
१९
हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, तरच आमचे तारण होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options