मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७९:८-१२

दयेची व दैवी निर्दोषत्वसिद्धीची विनंती

स्तोत्रसंहिता ७९:८-१२
आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
हे आमच्या उद्धारक परमेश्वरा, तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा; तुमच्या नामाकरिता आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.
१०
इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.
११
बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.
१२
हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options