स्तोत्रसंहिता ७९:५-७
५
हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?
६
अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.
७
त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.
Settings