Skip to content
स्तोत्रसंहिता ७८:५६-६४

स्तोत्रसंहिता ७८:५६-६४

५६
तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यांनी सर्वोच्च परमेश्वराविरुद्ध बंड केले; त्यांच्या आज्ञा पाळण्याचे नाकारले.
५७
जसा एक सदोष धनुष्य दुसरीकडे वळतो, ते आपल्या पूर्वजांप्रमाणेच अविश्वासू आणि विश्वासघातकी झाले.
५८
त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले.
५९
त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले.
६०
त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला,
६१
त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.
६२
त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.
६३
त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.
६४
याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options