Skip to content
स्तोत्रसंहिता ७७:२-९

स्तोत्रसंहिता ७७:२-९

माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.
परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो; मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. सेला
तुम्ही माझे डोळे बंद होऊ दिले नाही; मला बोलताही येत नव्हते इतका मी खिन्न झालो होतो.
मी पूर्वीच्या दिवसांबद्दल, फार पूर्वीच्या वर्षांबद्दल विचार केला;
रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे; माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:
“प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय? ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?
त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय?
परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options