स्तोत्रसंहिता ६९:२९-३६
२९
मी दुःखित आणि पीडित आहे— परमेश्वर तुमचे तारणच माझी सुरक्षा आहे.
३०
मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.
३१
यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या गोर्ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.
३२
दीनजन हे पाहतील आणि ते हर्षभरित होतील— तुम्ही जे परमेश्वराचा शोध करतात, त्यांच्या हृदयात नवजीवन येवो.
३३
याहवेह गरजूंचे ऐकतात आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.
३४
हे आकाशा, अगे पृथ्वी, हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,
३५
कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील. त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;
३६
त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल, त्यांच्या नावावर प्रीती करणारे सर्वजण तिथे वसती करतील.
Settings