स्तोत्रसंहिता ६८:२४-२७
२४
हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे; पवित्रस्थानाकडे माझ्या परमेश्वराची, माझ्या राजाची, मिरवणूक चालली आहे.
२५
गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्या वाजवित चालल्या आहेत.
२६
महासभेत परमेश्वराची स्तुती करोत; इस्राएलाच्या सभेत याहवेहची स्तुती करोत.
२७
बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे, यहूदाह वंशाचे अधिपती आणि जबुलून व नफताली वंशाचे अधिपती त्यामध्ये आहेत.
Settings