स्तोत्रसंहिता ६३:१-८
१
यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.
२
तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.
३
कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील.
४
माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.
५
उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.
६
माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.
७
कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.
८
मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.
Settings