स्तोत्रसंहिता ५९:११-१३
११
परंतु त्यांना जिवे मारू नका, माझे लोक लवकर विसरतील, प्रभू, तुम्ही आमची ढाल आहात. आपल्या बलाने त्यांना मुळासकट उपटा आणि त्यांना खाली पाडा.
१२
त्यांच्या मुखाने केलेली पापे, त्यांच्या ओठांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.
१३
त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा, त्यांना असे भस्म करा, की त्यांच्यातील काहीही शिल्लक राहणार नाही. तेव्हा दिगंतापर्यंत कळेल की परमेश्वर खरोखरच याकोबाचे सत्ताधारी आहेत. सेला
Settings