Skip to content
स्तोत्रसंहिता ५९:१४-१७

अंतिम परिणाम: दुष्टांची लाज व देवाची स्तुती

स्तोत्रसंहिता ५९:१४-१७
१४
संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत, हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
१५
अन्नाचा शोध करीत भटकतात आणि संतुष्ट झाले नाही तर भुंकत राहतात.
१६
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य आणि तुमची दया यांची गीते गाईन, कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
१७
हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे, कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा, तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options