Skip to content
स्तोत्रसंहिता ५७:८-११

स्तोत्रसंहिता ५७:८-११

८
हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
९
हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
१०
कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
११
हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options