Skip to content
स्तोत्रसंहिता ५७:७-११

ठाम स्तुती व उपासनेची बांधिलकी

स्तोत्रसंहिता ५७:७-११
हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.
हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
१०
कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
११
हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options