स्तोत्रसंहिता ५५:२०-२१
२०
माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे.
२१
त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते.