स्तोत्रसंहिता ४९:१०-१९
१०
सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते; मूर्ख व अज्ञानी माणसेही मरण पावतात, ते आपली संपत्ती दुसर्यांसाठी ठेवून जातात.
११
त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली, तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील; ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील.
१२
परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.
१३
ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला
१४
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
१५
परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला
१६
जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात, त्यांच्या घराचे वैभव वाढेल, तेव्हा भेदरून जाऊ नका.
१७
कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत; त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही.
१८
जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली— कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते—
१९
तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.