स्तोत्रसंहिता ४३:५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५ दाखवत आहे.
२
कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्या छळामुळे मी का दुःखी व्हावे?
३
तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.
४
तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन, तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत; आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
५
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
Settings