स्तोत्रसंहिता ४२:५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५ दाखवत आहे.
२
माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?
३
रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”
४
या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.
५
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
६
माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.
७
तुमच्या गर्जणार्या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.
८
तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो.
Settings